आता एका क्लिकवर मिळणार फडफडीत मासे!Now you can buy fish on one click, new website for Mumbai peoples

आता एका क्लिकवर मिळणार फडफडीत मासे!

आता एका क्लिकवर मिळणार फडफडीत मासे!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई>

सुरमई, पापलेट, हलवा हे मुंबईकर खवय्यांचे फेव्हरेट मासे. यासाठी मच्छीमार्केट किंवा दारावरच्या भैयाकडे घासाघीस करावी लागते. मात्र त्यानंतरही ते ताजे आहेत की बर्फातले? याबाबतही शंकाच. मुंबईकरांचे हे टेन्शन दूर होणार असून वेबसाइटवरील एका क्लिकवर मासे खरेदी करता येणार आहेत. www.mumabaifish.com या वेबसाइटवर फक्त ऑर्डर नोंदवायचा अवकाश की मासे थेट समुद्रातून सकाळी सकाळी घरपोच.

मासेखाऊ मुंबईकरांची मागणी पुरविण्यासाठी मुंबईतील सॉफ्टवेअर व्यवसायातील तज्ज्ञ एकत्र आले. त्यांनी ही वेबसाइट तयार केली असून सुरमई, पापलेट, हलवा, खेकडा, कोळंबी, तिसर्‍या इ. अगदी हवे ते माशाचे प्रकार आपल्याला घरपोच मिळणार आहेत. विशेष म्हणजे हे मासे कोणत्याही शितगृहात न ठेवता बंदरावरून थेट घरपोच होणार आहेत.

माशांसाठी वेबसाइटप्रमाणेच दूरध्वनीवरूनही ऑर्डर बुक करता येणार आहे. यासाठी ७६६६६६६६५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. वेबसाइटवर आदल्या दिवशी आर्डर नोंदवून डेबिट-क्रेडिट कार्डन पैसे भरले असले तरी जर आपल्याला माशांच्या ताजेपणाविषयी जराही शंका आली किंवा मासे पसंत पडले नाही तर आपले पैसे तिथल्या तिथं परत केले जातील, असा दावाही करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हे मासे साफ करून अगदी हवे असल्यास तुकडी करून आपल्याला घरी मिळणार आहेत. त्यामुळे गृहिणींचा मासे साफ करण्याचा त्रासही वाचणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 13, 2014, 12:55


comments powered by Disqus