शोरुममधील अंतर्वस्त्र घातलेले पुतळे हटवा! Objection raise on mannequins of ladies in showrooms

शोरुममधील अंतर्वस्त्र घातलेले पुतळे हटवा!

शोरुममधील अंतर्वस्त्र घातलेले पुतळे हटवा!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दुकानं आणि शोरुमसमोर अंतर्वस्त्रांची जाहिरात करणा-या पुतळ्यांवर आक्षेप घेण्यात आलाय. दुकानांसमोर असलेले पुतळे विशेषतः महिलांच्या पुतळ्यांना हा विरोध करण्यात येतोय.

मुंबई महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांनी अशा मॅनिक्विन्सला विरोध केलाय. दुकानांसमोर लावण्यात आलेले ते पुतळे अश्लील असल्याचा तावडे यांचा दावा आहे. या पुतळ्यांवर बंदी आणावी अशा मागणीचा प्रस्ताव त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांसमोर दाखल केलाय.

आयुक्त या प्रस्तावावर काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 20, 2013, 17:13


comments powered by Disqus