Last Updated: Monday, November 5, 2012, 16:04
www.24taas.com, मुंबईमुंबईत मालाडमध्ये एका वृद्ध महिलेची हत्या झालीय. मालाडच्या मोहन कॉलनीत ही घटना घडलीय. निर्मला व्होरा असं या महिलेचं नाव असून चोरीच्या उद्देशानं त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे.
व्होरा यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. घटनास्थळी पोलिसांना चाकू आढळला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. या घटनेमुळे मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
मुंबईमध्ये अशा प्रकारच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या होण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे. बहुतेकवेळा या हत्या चोरीच्या निमित्तानेच होतात. त्यामुळे शहरामध्ये भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण पसरलं आहे.
First Published: Monday, November 5, 2012, 16:04