Last Updated: Tuesday, August 27, 2013, 08:43
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईअमेरिकन महिलेवरील ब्लेड हल्ला प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. राजकुमार तिवारी असं या आरोपीचं नाव आहे. धावत्या लोकलमध्ये अमेरिकन महिला मिशेल मार्क यांच्यावर ब्लेडनं हल्ला करण्यात आला होता.
चोरीच्या उद्देशानं हा हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. तरुणीवर ब्लेडनं हल्ला करून मोबाइल, पर्सची चोरी करणाऱ्या राजकुमार तिवारीला रेल्वे पोलिसांनी सीएसटी परिसरातून अटक केली. राजकुमार तिवारी हा एक तडीपार गुन्हेगार आहे.
नशेच्या अधीन झालेल्या तिवारीनं चरस विकत घेण्यासाठी हे कृत्य केलंय. ही नशा भागवण्यासाठी त्यासाठी त्यानं तरुणीचा जवळपास ३० हजार रुपयांचा मोबाईल चरसचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला फक्त ३०० रुपयांत विकल्याचंही चौकशीत स्पष्ट झालंय.
बोरीवलीच्या दिशेनं निघालेल्या लोकलमध्ये प्रवास करताना मिशेलवर मरीन लाईन्स आणि चर्नी रोडदरम्यान हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात तिच्या हात आणि मानेवर जखमा झाल्या होत्या. मिशेलनं दिलेल्या वर्णनावरून शोध घेताना रेखाचित्र आणि तिवारीचं वर्णन तंतोतंत जुळल्यावर पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली. राजकुमार मुळचा उत्तर प्रदेशातील वाराणसी इथला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, August 27, 2013, 08:43