सेनेचं टार्गेट पुन्हा एकदा `पाक कलाकार`, pakistan artist, again target of shivsena

सेनेचं टार्गेट पुन्हा एकदा `पाक कलाकार`

सेनेचं टार्गेट पुन्हा एकदा `पाक कलाकार`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आता शिवसेनेचा मोर्चा पुन्हा एकदा पाकिस्तान कलाकारांकडे वळला आहे. ‘पाक कलाकारांना घ्याल तर याद राखा’ असा इशारा शिवसेनेच्या चित्रपट सेनेनं दिलाय.

सध्या, सोनी आणि कलर्स या चॅनलवर काही कॉमेडी कार्यक्रमांत पाकिस्तानी कलाकार सहभागी झालेले आहेत. ऑप्टीमिस्टीक, सोल इव्हेंट या प्रोडक्शन हाऊसद्वारे या कार्यक्रमांचं काम चालतं. याच प्रोडक्शन हाऊसला आपलं टार्गेट करत सेनेची चित्रपट सेना बुधवारी गोरेगावच्या फिल्मसिटीवर दाखल झाली होती.

‘पाकिस्तान आपला शब्द पाळत नाही, मग त्यांच्या कलाकारांना भारतात थारा कशाला’ असा प्रश्न उपस्थित करीत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रोडक्शन हाऊसवर धडक दिली. सोबतच यापुढे ‘एक जरी पाकिस्ताना कलाकार काम करताना दिसला तर लक्षात ठेवा’, असा सज्जड दमच या प्रोडक्शन हाऊसना दिल्याचं चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष हरमित सिंग आनंद यांनी म्हटलंय. ‘यापुढे पाकिस्तानी कलाकारांना संधी दिली तर याद राखा. शिवसेना चित्रपट सेना चित्रीकरण बंद पाडेल’ असा धमकीवजा इशाराही यावेळ सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इथल्या प्रोडक्शन हाऊसला दिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013, 14:35


comments powered by Disqus