नरे पार्क मैदान बचाव : शिवसेना-मनसे आमने सामने, Parel Nare Park Maidan : Shiv Sena X MNS

नरे पार्क मैदान बचाव : शिवसेना-मनसे आमने सामने

नरे पार्क मैदान बचाव : शिवसेना-मनसे आमने सामने
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या परळमधलं नरे पार्क मैदान बचावासाठी शिवसेना सरसावली आहे. त्यासाठी सह्यांची मोहीम सुरु करण्यात आली आहे. तर मनसेही मैदानात उतल्याने दोन्ही पक्ष या मुद्द्यावरून आमने-सामने आले आहेत.


या मैदानावर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्याबरोबरच स्विमिंग पूल, जॉगिंग पार्क, क्लबचं बांधकाम करण्याची योजना मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी आणली आहे. हा शिवसेनेला शह देण्याचा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे.

मैदानात असलेल्या अभ्यासिकेचं उदघाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं आणि त्यांच्या या स्मृती जपण्यासाठी या भागातल्या शिवसैनिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

कुठल्याही परिस्थितीत नरे पार्क मैदानात नवीन बांधकाम करु दिलं जाणार नसल्याचा निर्धार शिवसेना नेत्यांनी व्यक्त केला आहे.शिवसेनेच्या आंदोलनाला मैदान बचाव समितीनंही पाठिंबा दिला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 13:11


comments powered by Disqus