Last Updated: Sunday, September 30, 2012, 14:35
www.24taas.com, मुंबईकेंद्र सरकारनं पासपोर्टची फी 500 ते 1000 रुपयांनी वाढवलीये. त्यामुळे आता सामान्य कोट्यातल्या पासपोर्टसाठी दीड हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
तात्काळ मिळणारे पासपोर्ट 1000 रुपयांनी महागलेत. आता त्यासाठी साडेतीन हजार रुपये मोजावे लागतील. गेल्या काही वर्षांत पासपोर्ट वितरणामध्ये परराष्ट्र मंत्रालय अनेक बदल करतंय.
उद्यापासून जगणं महागणार आहे. पासपोर्टची फी तर वाढली आहे. पण त्याच बरोबर लांब पल्ल्याच्या एसी गाड्या आणि मुंबईतल्या फर्स्टक्लासवर उद्यापासून सेवाकर लागू होणार आहे. त्यामुळे एसी-फर्स्टक्लासचा प्रवास साधारण 4 टक्क्यांनी महागणार आहे.. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यातही वाढ होणार आहे.
First Published: Sunday, September 30, 2012, 14:32