Last Updated: Sunday, January 26, 2014, 15:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई दारूच्या नशेनं एका तरुणीचा घात केला. तिच्या नशेचा फायदा घेत सुरक्षारक्षकानंच तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पवई इथं घडलीय. ही तरुणी इतक्या नशेत होती की तिला इमारतीत परतल्यानंतर पुढं काय घडलं यातलं काहीच आठवत नाही. ज्यानं अत्याचार केला तो सुरक्षारक्षकच होता हेही ती ठामपणे सांगू शकत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
पवईत राहणारी आणि पश्चिम उपनगरात डान्स क्लास घेणारी २५ वर्षीय तरुणी गुरुवारी रात्री आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पबमध्ये गेली होती. मध्यरात्री अडीचच्या सुमारास मित्रानं या तरुणीला इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षानं सोडलं आणि तो निघून गेला. चालता येत नसल्यानं तिनं सुरक्षारक्षक प्रमोद उपाध्याय (३५) याला घरी सोडण्याची विनंती केली. प्रमोदनं मात्र तरुणीच्या या अवस्थेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला.
पहाटे तरुणीच्या भावानं तिला जखमी अवस्थेत इमारीच्या लॉबीत पाहिलं. तेव्हा ती बेशुद्ध होती. त्यानं तत्काळ या तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. तिथून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. वैद्यकीय चाचणीत या तरुणीच्या शरीरावर चावल्याच्या जखमा आढळल्या. शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा इमारतीत पोहोचेपर्यंतचे तपशील तिनं सांगितला. मात्र त्यानंतर काय घडलं हे तिला आठवत नव्हतं.
त्यामुळं पोलिसांनी मध्यरात्रीच्या ठराविक वेळेतले सीसीटीव्ही पडताळून पाहिलं. त्यात सुरक्षारक्षक उपाध्याय याच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. त्यानं या तरुणीवर बलात्कार केल्याचं चौकशीदरम्यान सांगितलं. या प्रकरणी उपाध्यायला बलात्काराच्या गुन्ह्यान्वये अटक केली. कोर्टानं त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 26, 2014, 15:36