सेनेची घोषणा हवेत, ‘वाय-फाय’साठीही मोजावे लागणार पैसे?, pay money for BMC wi-fi

सेनेची घोषणा हवेत, ‘वाय-फाय’साठीही मोजावे लागणार पैसे?

सेनेची घोषणा हवेत, ‘वाय-फाय’साठीही मोजावे लागणार पैसे?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईकरांना फ्रीमध्ये वाय-फाय उपलब्ध करून देण्याची घोषणा मागील महापालिका निवडणुकांदरम्यान शिवसेनेनं केली होती. परंतु, आपल्या या घोषणेला हरताळ फासत आत्ता ‘मोफत वाय-फाय’ उपलब्ध करून देणं अशक्य असल्याचं मुंबई महापालिकेनं म्हटलंय.

मुंबई महापालिकेनं मारलेल्या `यू-टर्न`मुळे `वाय-फाय` सुविधेसाठी मुंबईकरांना पैसे मोजावे लागण्याची चिन्ह आहेत. ‘वाय-फाय उपलब्ध करून देण्याच्या आर्थिक अंदाजपत्रकावर आम्ही काम करत आहोत आणि येत्या दोन महिन्यात हा प्रकल्प सुरू होईल अशी आशा आहे. पण, प्राथमिक तत्वावर नागरिकांना या सुविधेसाठीठी शुल्क भरावं लागू शकतं’ अशी कबुली शिवसेना नगरसेवक आणि महापालिकाचे महापौर सुनिल प्रभू यांनी दिलीय.

वाय-फाय उपलब्ध करुन देण्याच्या पहिल्या टप्प्यात मुंबई महानगरपालिका ही योजना दक्षिण मुंबईतील सीएसटी, दलाल पथ, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी मार्ग, हुतात्मा चौक आणि महात्मा गांधी मार्ग याठिकाणी सुरू करण्याच्या विचारात आहे. या सुविधेतून नागरिकांना वरील भागात कोणत्याही ठिकाणी वाय-फायच्या माध्यमातून इंटरनेट मोफत वापरता येणार आहे. यात बस, रेल्वे स्थानक अशा सार्वजनिक ठिकाणीही इंटरनेट वापरता येणार आहे. यासाठी उभारण्यात येणारे टॉवर्स, त्यांना लागणाऱया जागा माहापालिकेद्वारे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मुळात हा प्रकल्प महापालिका २००८ सालीच सुरू करणार होती परंतु, मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामुळे हा वाय-फाय प्रकल्प बारगळला होता.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 24, 2013, 23:43


comments powered by Disqus