बाप्पाच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात, people welcoming new year from siddhivinay temple

बाप्पाच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात

बाप्पाच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठीही भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलीय. नवीन वर्षाचा प्रारंभ बाप्पाच्या दर्शनानं करण्याची भाविकांची इच्छा असते. त्यामुळं काल रात्रीपासूनच सिद्धिविनायक मंदीरात भाविकांच्या रांगा लागल्यात.

अनेकांनी पहाटे पहाटे बाप्पाचं दर्शन घेत आपल्या नववर्षाला सुरूवात केलीय. दरवर्षीच नववर्षाच्या पहिल्या दिवशी हजारो भाविक सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. यासाठी, पहाटे पहाटे ३.३० वाजल्यापासून दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं होतं. पहाटे साडेतीन वाजल्यापासून सुरू झालेले दर्शन भाविकांची रांग संपेपर्यंत सुरू राहणार असल्याचे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरच्या न्यासानं स्पष्ट केलं होतं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 1, 2014, 10:17


comments powered by Disqus