Last Updated: Saturday, June 15, 2013, 18:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईडॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाल्याने तेल कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.
देशातील प्रमुख तेल कंपन्यांतील अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. गेल्यावेळी ३१ मे रोजी पेट्रोलच्या दरात ७५ पैसे आणि डिझेलच्या दरात ५० पैशांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरील सरकारचे नियंत्रण हटविल्याने बाजारातील स्थितीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार होत आहेत. डिझेलच्या दरात दर महिन्याला ५० पैशांची वाढ करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी यापूर्वीच घेतलेला आहे.
दिल्लीत सध्या पेट्रोलचे दर ६३.९९ पैसे असून, दोन रुपयांनी वाढ झाल्यास दर ६५.९९ पैसे होणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची गेल्या सहा आठवड्यापासून घसरण होताना दिसत आहे. त्याचे परिणाम तेलाच्या किंमतींवर होत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 15, 2013, 18:36