Last Updated: Thursday, June 27, 2013, 09:44
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्ही बाहेरून जेवणाची ऑडर केलेय. तर सावधान! कारण मुंबईत एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. पिझ्झा देण्याचा बहाणाकरून एका अल्पवयीन मुलाने २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना वरळीत येथे काल घडली.
वरळी परिसरात राहणार्या या पिडीत तरूणीने पिझ्झाची प्रभादेवीतल्या पिझ्झा सेंटरला ऑडर दिली होती. रात्री आठच्या सुमारास सेंटरमधील पिझ्झा डिलेव्हरी बॉयने या तरुणीला तिच्या ऑर्डरप्रमाणे पिझ्झा दिला, पैसे घेतले आणि निघून गेला. मात्र, डिलेव्हरी बॉय दहा मिनिटांनी पुन्हा या तरुणीच्या घरी धडकला. मी चुकून दुसरीच ऑर्डर तुम्हाला दिली, असे तो सांगू लागला. त्याचदरम्यान, डिलेव्हरी बॉयने तरुणीला दारातूनच मागे ढकलले आणि घरात घुसला आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.
डिलेव्हरी बॉयने या तरुणीवर हल्लाही केला. त्याने या तरुणीवर वार केले आणि मोबाइल चोरून पसार झाला. जाताना घर बाहेरून बंद केले. तरुणीच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारी धावत आले. त्यांनी तिला पोद्दार रुग्णालयात दाखल केले. सध्या या तरुणीवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डिलेव्हरी बॉयने पिझ्झासोबत बिल दिले होते. पोलिसांना तरुणीच्या घरून पिझ्झाचे बिल सापडले. त्यावर पिझ्झा सेंटरचे नाव आणि पत्ता होता. त्यावरून पोलिसांनी पिझ्झा सेंटर गाठून या डिलेव्हरी बॉयला अटक केली. त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर त्याची रवनागी बालसुधारगृहात केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, June 27, 2013, 09:00