Last Updated: Saturday, August 18, 2012, 09:06
www.24taas.com, मुंबईमुंबई हायकोर्टाने दीडशे वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि आयआयटीच्या सुवर्ण महोत्सवी दिक्षांत समारंभासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. मुंबईतील हिंसाचाराच्या घटनेनंतर प्रथमच पंतप्रधान मुंबईला आले आहेत.
विमानतळावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी त्यांचं स्वागत केलं. एनसीपीए इथं सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
पंतप्रधानांसह सरन्यायाधीश एस. कापडिया, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी अडीच वाजता आयआयटीच्या दीक्षांत समारंभालाही पंतप्रधान उपस्थित राहतील.
First Published: Saturday, August 18, 2012, 09:06