रामदास आठवलेंच्या कविता आणि लाल गाडीचा किस्सा , poems by ramdas athwale

रामदास आठवलेंच्या कविता आणि किस्सा लाल गाडीचा

रामदास आठवलेंच्या कविता आणि किस्सा लाल गाडीचा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत रिपाईच्या महिला विभागानं सोमवारी वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व दाखविलेल्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव केला. प्रभादेवीमध्ये झालेल्या या सोहळ्यामध्ये चर्चेत राहिला तो लाल दिव्याच्या गाडीचा किस्सा... याच कार्यक्रमात रामदास आठवलेंनी त्यांची साहित्य संमेलनात म्हणायची राहून गेलेली कविताही सादर केली.

या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, महिला विभागाच्या प्रमुख आणि आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले उपस्थित होत्या. भाजप युवा नेत्या पुनम महाजन, शायना एनसी यांचीही या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाजन यांनी आपल्या भाषणात रिपाईपुढे ठेवलेल्या दोन लाल दिव्यांच्या गाड्यांचा प्रस्ताव, त्यावर सीमाताई आणि रामदास आठवले यांनी केलेली मार्मिक टोलेबाजी यामुळे सोहळा रंगतदार झाला.


व्हिडिओ पाहा -




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 7, 2014, 14:24


comments powered by Disqus