मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर पुन्हा विषारी मासे

मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर पुन्हा विषारी मासे

मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर पुन्हा विषारी मासे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतील बीचवर फिरायला जाऊ नका, नाहीतर तुम्हाला धोक्याचा सामना करावा लागेल. जुहू समुद्र किनाऱ्यावर विषारी मासे दाखल झाले आहेत. त्यामुळे या माशांचा चावा तुमच्या जीवावर बेतला जाऊ शकतो.

जुहूच्या समुद्रकिना-यावर कोळ्याच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात विषारी मासे येत आहेत. हे विषारी मासे चावल्यामुळे मोठी जखम होऊ शकते. हे मासे सध्या जुहूच्या किना-यावर मोठ्या प्रमाणात साप़डत असल्यामुळे कोळी बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

ईल, स्टींग रे, बारशिंगली असे विषारी मासे सध्या मिळत आहेत. गणेश विसर्जनाच्या वेळी स्टिंग रे माशांनी विसर्जनाला पाण्यात उतरलेल्यांचा चावा घेतल्याची घटना ताजी आहे. त्यातच आता हे मासे पुन्हा किना-यावर मिळाल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

फोटोफीचर विषारी मासे दाखल


First Published: Saturday, October 26, 2013, 15:18


comments powered by Disqus