मुंबईच्या दांडियात पेताड पोलिसांचे दांडुके police beat up people who were playing Dandiya

मुंबईच्या दांडियात पोलिसांचे दांडुके

मुंबईच्या दांडियात पोलिसांचे दांडुके
www.24taas.com, मुंबई

मुंबईच्या खार भागातल्या रहिवाशांना पोलिसांच्या दंडुकेशाहीचा अनुभव आला. सध्या मुंबईत ठिकठिकाणी नवरात्रानिमित्त गरबा दांडिया सुरु आहेत रात्री दहा पर्यंत लाऊडस्पीकर लावून दांडिया खेळण्यास परवानगी आहे तर 12 पर्यंत लाऊडस्पीकर शिवाय दांडिया खेळता येतो.

मात्र खार परिसरात रात्री 10 वाजता दांडीया सुरु असताना पोलीस अचनाक आले आणि त्यांनी काहीही कारण न देता तिथं दांडीया खेळणा-यांवर लाठीमार सुरु केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस मद्यधुंद अवस्थेत होते. या लाठीमारात 8 जण जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी पोलीस स्टेशनला घेरावही घातला. घटनेचं गांभीर्य पाहत वरिष्ठ अधिका-यांनी घटनेची चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय.

एकीकडे पोलिसांवर हात उचलणा-यांवर कडक कारवाईचे आदेश निघालेले असताना पोलिसांच्या या विनाकारण दंडुकेशाहीचा निषेध कुणाकडे करायचा असा सवाल नागरिक उपस्थित करताहेत...

First Published: Sunday, October 21, 2012, 12:23


comments powered by Disqus