पोलीस व्हॅन अपघातातील तरूणीचा मृत्यू, police car accident in Mumbai

पोलीस व्हॅन अपघातातील तरूणीचा मृत्यू

पोलीस व्हॅन अपघातातील तरूणीचा मृत्यू
www.24taas.com,मुंबई

मुंबईतल्या विलेपार्लेत पोलिसांच्या व्हॅननं दिलेल्या धडकेत एका बावीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. अवनी देसाई असं मृत तरुणीचं नाव आहे.

अवनी रविवारी रात्रीच्या सुमारास तिच्या आजोबांना जेवणाचा डबा देण्यासाठी स्कूटीवरुन गेली होती. तिथून घरी परतताना शिवाजी चौकात पोलिसांच्या व्हॅननं अवनीच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. यात अवनी गंभीर जखमी झाली तर तिच्या दहा वर्षाच्या लहान भावाला किरकोळ जखम झाली.


जखमी अवनीला उपचारासाठी नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान घटनेवेळी क्वॉलिस चालवणारा पोलीस दारुच्या नशेत असल्याचा आरोप अवनीच्या नातेवाईकांनी केलाय. मात्र घटनेनंतर करण्यात आलेल्या चालक पोलिसांच्या मेडिकल रिपोर्टमध्ये तो नशेत नसल्याचं समोर आलंय.

First Published: Monday, December 31, 2012, 10:56


comments powered by Disqus