Last Updated: Wednesday, November 28, 2012, 19:26
www.24taas.com, मुंबईसुमारे हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोपी आणि स्टॉक गुरू कंपनीचा मालक उल्हास खरेच्या विविध घरांवर छापे मारून महाराष्ट्र पोलिसांनी सुमारे २० कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. स्टॉक गुरू उल्हासच्या खुलाशानंतर दिल्ली पोलिसांनी मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करून त्याच्या राहत्या ठिकाणांवर छापे मारले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या अवैध संपत्ती आणि काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये २० कोटी रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. हा ऐवज पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी छाप्यात १५ लाखांचे दागिने, बनावट रेशन कार्ड, डिमॅट अकांउट, १८ पॅन कार्ड, सात लक्झरी कार, ६० महागडे घड्याळ, ४८ महागडे फोन, ७५ डेबिट कार्ड, १३१ चेकबुक जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, स्टॉक गुरू लवकरच एक मराठी चित्रपट निर्माण करणार असल्याचेही या चौकशीत स्पष्ट झाले आहे. दिल्ली पोलिसांचे सहायक पोलिस आयुक्त संदीप गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हास याने मुंबईत भाडेतत्वाने एक ऑफीस घेतले होते. याद्वारे तो मराठी चित्रपट बनू इच्छित होता. त्यासाठी त्याने नावही निश्चित केले होते.
First Published: Wednesday, November 28, 2012, 19:26