पुढच्या वर्षीपासून पोलीस भरती कार्यक्रमात बदल police recruitment process will change from next year

पुढच्या वर्षापासून पोलीस भरती कार्यक्रमात बदल

पुढच्या वर्षापासून पोलीस भरती कार्यक्रमात बदल
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

पोलीस भरतीसाठी आलेल्या चौघा उमेदवारांचे जीव गेल्यानंतर राज्य सरकारला जाग आलीय.

पुढच्या वर्षीपासून पोलीस भरती कार्यक्रमात बदल करण्यात येतील.

उमेदवारांना यापुढं 5 किलोमीटरऐवजी 3 किलोमीटर धावावं लागेल आणि सकाळी 8 नंतर शारीरिक चाचण्या होणार नाहीत, अशा महत्त्वपूर्ण घोषणा आर. आर. पाटील यांनी आज केली आहे.

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली.

दोघा जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. 

यंदाच्या वर्षी आचारसंहितेमुळं पोलीस भरतीला विलंब झाल्याचा खुलासा त्यांनी केला.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 15, 2014, 15:57


comments powered by Disqus