Last Updated: Friday, June 13, 2014, 13:43
मुंबईतील विक्रोळीमध्ये सुरु असलेली पोलीस भरती उमेदवारांच्या जीवावर उठली आहे. पोलीस भरतीचा तिसरा बळी गेलाय. विशाल केदारे या तरुणाचा उपचारादम्यान मृत्यू झाला.
कडक उन्हामुळे विशाल भोवळ आली होती. त्याला मुलुंडमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. भर उन्हात सुरु असलेल्या पोलीस भर्तीमुळे पाच दिवसांपूर्वी विशाल जखमी झाला होता. विशाल हा शेतकरी कुटुंबातील असून तो नाशिकचा रहिवासी होता. तो आई-वडिलांचा एकुलता होता. त्यामुळे विशालच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान याआधी दिवसांपूर्वी अंबादास सोनावणे आणि आणखी एका उमेदवाराचा मृत्यू झाला होता. पोलीस भरतीने तिघांचे बळी घेतले आहे. कडक उन्हात भरती प्रक्रिया घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 13, 2014, 13:43