व्हॅनमध्ये रसायन सांडल्याने महिला पोलीस जखमी, Police van , Mumbai

व्हॅनमध्ये रसायन सांडल्याने महिला पोलीस जखमी

व्हॅनमध्ये रसायन सांडल्याने महिला पोलीस जखमी
www.24taas.com, मुंबई

मुंबईत पोलीस व्हॅनमध्ये बॅटरीतील रसायन सांडल्याने पाच महिला पोलीस जखमी झाल्यात. ही घटना आज कुर्ला येथे घडली. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय.

कुर्लातील विनोबा भावे नगरमध्ये आज एका पोलीस व्हॅनमध्ये बॅटरीतून रसायन सांडल्याने पाच महिला पोलीस जखणी झाल्यात. यावेळी बॅटरीतील रसायन व्हॅनमध्ये बसलेल्या महिला पोलिसांच्या पायावर पडल्यामुळे त्या जखमी झाल्यात.

जखणी पाच महिला पोलिसांना भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. या अपघाताची अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

First Published: Wednesday, February 20, 2013, 18:53


comments powered by Disqus