24taas.com - prabhakar kunte & ashok mehata death in mumbai

प्रभाकर कुंटे, अशोक मेहता यांचं निधन

प्रभाकर कुंटे, अशोक मेहता यांचं निधन
www.24taas.com,मुंबई

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कुंटे यांचं मुंबईत निधन झालंय. स्वातंत्र्यसैनिक असलेल्या प्रभाकर कुंटेंनी राज्यात मंत्रिपदही भूषवलं होतं. तर बॉलिवूडचे प्रसिध्द सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांचंही मुंबईत निधन झालं.

१९४२च्या चले जाव चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. स्वातंत्र्यलढ्याबरोबरच संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि गोवा मुक्ती संग्राम मध्येही त्यांचा सहभाग होता.
१९७२साली धारावी मतदार संघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. शंकररावांच्या कार्यकाळात त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्रीपद भूषविलं.

मेहता यांचं मुंबईत निधन
बॉलिवूडचे प्रसिध्द सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांचं मुंबईत निधन झालं. काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते...त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होता.

बैंडिट क्वीन,मंडी, त्रिकाल,परोमा, उत्सव,राम लखन, खलनायक, गजगामिनी अशा गाजलेल्या सिनेमांची त्यांनी सिनेमॅटोग्राफी केली होती.

तसंच मोक्ष या हिंदी सिनेमासाठी त्यांनी दिग्दर्शनही केलं होतं. या सिनेमातूनच त्यांनी अभिनेता अर्जुन रामपालला ब्रेक दिला होता.

First Published: Wednesday, August 15, 2012, 21:50


comments powered by Disqus