Last Updated: Monday, January 13, 2014, 10:58
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई२३ जानेवारी बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस... त्यांचा जन्मदिवस शिवसेनेकडून प्रतिज्ञा दिन म्हणून साजरा केला जाणारेय... त्यानिमित्त शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणारेय.
२३ जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमाविषयी माहिती उद्धव ठाकरे मातोश्रीवर आज पत्रकार परिषदेत माहिती देणारेत.
दरम्यान नुकत्याच झालेल्या मुंबईतल्या मोदींच्या महागर्जना रॅलीत बाळासाहेबांचा टाळला गेलेला उल्लेख, उद्धव ठाकरेंना या कार्यक्रमाचं नसलेलं निमंत्रण, मोदींवर राज ठाकरे यांनी केलेली टीका, राज यांची ‘आप’वरील प्रतिक्रिया या सर्व पार्श्वभूमीवरही उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, January 13, 2014, 10:58