Last Updated: Thursday, June 19, 2014, 17:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईप्रीती झिंटा आणि नेस वाडीया वादात अंडरवर्ल्डनं उडी घेतल्यानंतर आता वाडीया परिवाराची सुरक्षा वाढवण्यात आलीये. रवी पुजारीनं १६ जूनला इराणहून फोन करुन वाडीया परिवाराला प्रीती पासून लांब राहण्याची धमकी दिली होती. अशा परिस्थितित वाडीया परीवाराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीये.
तर दुसरीकडे रवी पुजारीनं फ़ोन केला होता की, त्याला फोन करण्यास सांगितलं होतं. यासाठी प्रीती झिंटा आणि वाडीया परिवारावर पोलिसांनी नज़र ठेवली आहे. दोन्ही बाजूनं पोलीस तपास करत असल्याचं एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलंय.
तर आज प्रिती भारतात परत येणार असून रात्री उशीरा मरीन ड्राईव्ह पोलीस प्रीतीचा जबाब नोंदवणार आहेत. दरम्यान, आज याप्रकरणी आयपीएलचे सीओओ सुंदर रमनचा जबाब नोंदवण्यात आला असून त्यांनी प्रीती सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 19, 2014, 17:36