प्रीती छेडछाड प्रकरण; नेसच्या वडिलांना अंडरवर्ल्डकडून धमक्या, Preity-Ness case: Wadia Group receives

प्रीती छेडछाड प्रकरण; नेसच्या वडिलांना अंडरवर्ल्डकडून धमक्या

प्रीती छेडछाड प्रकरण; नेसच्या वडिलांना अंडरवर्ल्डकडून धमक्या
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

नेस वाडियांचे वडिल नुस्ली वाडिया यांना अंडरवर्ल्डने धमकी दिलीय. मंगळवारी सकाळी ‘वाडिया ग्रुप’तर्फे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. रवी पुजारी गँगने नुस्ली वाडिया यांना धमकी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळातेय.

नेसचे वडील, उद्योगपती आणि वाडिया ग्रुपचे प्रमुख नुस्ली वाडिया यांनी एन. एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार नोंदवलीय. मिळालेल्या माहितीनुसार, रवी पुजारी गँगकडून आपल्याला हानी पोहचवण्याची धमकी मिळत असल्याचं नुस्ली वाडिया तक्रार यांनी नोंदवलीय. परंतु, प्रीती झिंटा-नेस वाडिया वादाचा या कॉल्सशी प्रकरणाशी काही संबंध आहे किंवा नाही, हे मात्र अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मुंबई पोलिसांनी नुस्ली वाडिया यांची तक्रार अॅन्टी एक्स्टॉर्शन सेलकडे सोपवलीय.

दरम्यान, प्रिती झिंटा छेडछाड प्रकरणी आयपीएलचे ‘चीफ ऑफरेटींग ऑफिसर’ म्हणजेच सीओओ सुंदर रमण यांनी पोलिसांकडून माहिती घेतलीय. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रीतीने झाल्या प्रकाराबाबत सुंदर रमण यांना माहिती दिली होती. घटनेच्या दरम्यान सुंदर रमण पॅव्हेलियनमध्ये नव्हते. मात्र प्रितीनं छेडछाड प्रकरणाबाबत सांगितल्यावर सुंदर रमण यांनी या प्रकरणात ‘नंतर लक्ष घालीन’ असं आश्वासन दिलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार सुंदर रमण गुरुवारी पोलिसांची भेट घेण्याची शक्यता आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 18, 2014, 12:17


comments powered by Disqus