पंतप्रधानपदासाठी स्वराज योग्य व्यक्ती - ठाकरे, Prime Ministerial candidate Sushma Swaraj - Bal Thackeray

पंतप्रधानपदासाठी स्वराज योग्य व्यक्ती - ठाकरे

 पंतप्रधानपदासाठी स्वराज योग्य व्यक्ती - ठाकरे
www.24taas.com,मुंबई

विरोधी पक्षनेत्या आणि भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं मत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. सामनातील मुलाखतीत बाळासाहेबांनी हे मत व्यक्त केलंय.

हुशार, ब्रिलियन्ट अशी एकच व्यक्त आहे ती म्हणजे सुषमा स्वराज. ती अप्रतिमरीत्या दणदणीत काम करील, अशी माझं स्पष्ट मत असल्याचं बाळासाहेब म्हणालेत.

सुषमा स्वराज यांनी अलिकडेच मुंबई दौऱ्याच्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांमधील ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या भेटीनंतर ठाकरे यांनी केलेले कौतुक याच्याशी नाते जो़डले जात आहे.

या भेटीत सुषमा स्वराज यांनी कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणावरून सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात संसदेतील गोंधळासंदर्भात या चर्चा केल्याचे सांगण्यात आले. मात्र, ठाकरे यांनी पंतप्रधानांसाठी स्वराज योग्य असल्याचे भाष्य केल्याने स्वराज यांचे नाव आता पुढे येऊ लागले आहे.

First Published: Sunday, September 9, 2012, 12:51


comments powered by Disqus