मुख्यमंत्री-खडसे भेटीचं गुपीत काय?, prithviraj chavhan & eknath khadse meet

मुख्यमंत्री-खडसे भेटीचं गुपीत काय?

मुख्यमंत्री-खडसे भेटीचं गुपीत काय?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. ही भेट कौटुंबिक असल्याचं खडसे यांनी सांगितलंय.

काही दिवसांपूर्वी आजारी होतो त्यामुळे प्रकृती विचारपुस करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते असं खडसेंनी सांगितलं. ही भेट जवळपास पावणे दोन तास चालली. सुरुवातीला काही काळ दोन्ही नेत्यांचे कुटुंबीय बैठकीमध्ये होते. त्यानंतर इतरांना बैठकीत बोलवण्यात आलं. त्यामुळं कौटुंबिक भेटीच्या नावाखाली दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीबाबत मुख्यमंत्री शरद पवारांची भाषा बोलत असल्याची टीका कालच खडसे यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आलंय. इतरही नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चितळे समितीसह इतर विषयांवर चर्चा झाल्याची माहिती खडसे यांनी दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, October 5, 2013, 20:32


comments powered by Disqus