Last Updated: Thursday, February 14, 2013, 08:49
www.24taas.com, मुंबई आत्तापर्यंत पालक आणि मुलांना कोंडीत पकडणाऱ्या खाजगी शाळांनी आता तर चक्क राज्य सरकारलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.
राज्यातील खाजगी शिक्षण संस्था चालकांनी आपल्या शाळा दहावी आणि बारावीच्या परिक्षेसाठी केंद्र म्हणून देण्यास विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारच्या खाजगी शाळांविरोधातील धोरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा अडचणीत येण्याची शक्यता आहे. ‘महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ’ ही राज्यातील खाजगी शाळांची संघटना आहे. या संघटनेने महिनाभरापूर्वी याबाबतची नोटीस राज्याच्या शिक्षण विभागाला दिली होती.
वेतनेतर अनुदानातील कपात, शिक्षक भरतीबाबत सरकारचे बंधन आदी मागण्या पूर्ण होत नसल्याने यावेळी दहावी आणि बारावीसाठी ३५०० ते ४००० केंद्र उपलब्ध न करून देण्याचा निर्णय खाजगी शाळांच्या संघटनेनं घेतला आहे.
First Published: Thursday, February 14, 2013, 08:48