३१ साजरा करणाऱ्या गणेशभक्तांवर `धर्मसंकट` Problem on 31st December

३१ साजरा करणाऱ्या गणेशभक्तांवर `धर्मसंकट`

३१ साजरा करणाऱ्या गणेशभक्तांवर `धर्मसंकट`
www.24taas.com, मुंबई

दरवर्षीप्रमाणं यंदाही थर्डी फर्स्टची तयारी जोरात सुरु आहे. 31 डिसेंबरच्या रात्री दारुची दुकाने, पब आणि क्लब उशिरापर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलीय. परंतु यावेळी थर्टी फर्स्ट साजरा करणा-या गणेशभक्तांसमोर वेगळच संकट उभं ठाकलंय.

कारण 1 जानेवारी रोजी अंगारकी संकष्टी असल्यानं अनेक गणेशभक्तांच्या थर्टी फर्स्ट साजरा करण्यावर मर्यादा पडणारेत. रात्री बारानंतर अंगारकी संकष्टी सुरु होणार असल्यानं बाराच्या आतच जल्लोष साजरा करावा लागणाराय. त्यामुळं गणेशभक्तांना थर्टी फर्स्ट साजरा करताना मनाला मुरड घालावी लागणार आहे.

दरम्यान, ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टसाठी राज्यातील वाईन - दारुची दुकानं रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहेत तर परमिट रुम आणि क्लब सकाळी पाचवाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. परंतू दारु पिणाऱ्यांना परवाना आवश्यक असेल. २४,२५ आणि ३१ डिसेंबरला दारु दुकाने उशिरापर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली.

First Published: Tuesday, December 25, 2012, 23:19


comments powered by Disqus