Last Updated: Sunday, December 16, 2012, 18:45
शिवसेनेचे आमदार पक्षाच्या विधीमंडळातल्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याचं वृत्त आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूरात शिवसेना आमदारांची एक बैठक झाली. यावेळी ज्येष्ठ नेते तरुण आणि ग्रामीण भागातल्या आमदारांना विश्वासात घेत नसल्याचं तसंच सभागृहांत बोलण्याची संधीच देत नसल्याबद्दल नाराजीचा सूर उमटलाय.
अविश्वास प्रस्तावावरून शिवसेनेची नाचक्की झाल्यानंही आमदार नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना विधीमंडळात काही जबाबदा-या बदलल्या जाण्याची तसंच नजिकच्या काळात इतरांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.
बाळासाहेब ठाकरेंवर अंत्यसंस्कार झाले, त्या ठिकाणी बांधण्यात आलेला चौथरा अखेर उद्या हलवण्यात येणार आहे. शिवसेना स्वतःच हे बांधकाम काढणार असल्यानं गेले दोन-तीन आठवडे सुरू असलेल्या वादावर पडदा पडणार आहे. उद्या समाधीस्थळी विधिवत पूजा होणार आहे. त्यानंतर हा चौथरा हलवला जाईल. उद्धव ठाकरे आणि कुटुंबिय यावेळी उपस्थित असतील.
First Published: Sunday, December 16, 2012, 18:45