Last Updated: Saturday, July 6, 2013, 08:49
www.24taas.com,झी मीडिया,मुंबईमुंबईत कांजूरमार्ग इथं २५ वर्षीय महिलेची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आलीये. पूजा गायकवाड असं या महिलेचं नाव आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर काल रात्री ९च्या सुमारास ही घटना घडलीये.
पूजाचं घर इथून जवळच आहे. हल्लेखोरानं तिला तिथं फोन करून बोलावून घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. तिच्या शरिरावर पाच ते ७ ठिकाणी चाकूचे वार करण्यात आलेत.
आठ महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. एका खासगी बँकेत नोकरी करणारी पूजी ही शांत स्वभावाची होती आणि तिचं कोणाशीच शत्रूत्व नव्हतं, अशी माहिती तिच्या घरच्यांनी दिलीये. हत्येच्या कारणांचा पोलीस शोध घेतायत.
#
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.#
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, July 6, 2013, 08:49