प्रभाकर देशमुखांचे अजित पवारांनी कान टोचले, pune Commissioner Prabhakar Deshmukh the landlord?

प्रभाकर देशमुखांचे अजित पवारांनी कान टोचले

प्रभाकर देशमुखांचे अजित पवारांनी कान टोचले
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केवळ १० दिवसांत एनए करून ३०० एकर जमीन बळकावल्याच्या झी २४ तासच्या वृत्ताची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी वारंवार संपर्क साधूनही खुलासा न करणा-या प्रभाकर देशमुखांचे अजित पवारांनी कान टोचले आहेत.

जमीन बळकावल्याच्या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा देशमुखांनी केला होता. त्यावर संबंध नसेल तर मग झी २४ तासवर खुलासा करा, अशा सूचनाही त्यांनी प्रभाकर देशमुखांना दिल्या आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या कुटुंबियांच्या नावावर तब्बल ३०० एकर जमीन असल्याचं प्रकरण झी २४ तासनं शोधून काढलंय.

प्रभाकर देशमुख एकेकाळी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे स्वीय सहायक होते. परंतु शरद पवारांच्या मालकीची केवळ २५ एकर एवढीच जमीन आहे. याउलट प्रभाकर देशमुख १२५ एकरहून अधिक जमिनीचे अधिकृत मालक आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणजे ३०० एकर जमिनीचे अधिकृत मालक. मात्र, ही संपत्ती कशी मिळविली त्याची बात निराळी आहे.

कोठे आहे ही जमीन
-लोधावडे, माण, सातारा येथे २४ लाख रूपये किंमतीची ३ हेक्टर २३ गुंठे जमीन
- नांदेड, हवेली, पुणे येथे १७ लाख रूपये किंमतीची ११ गुंठे जमीन
- लोधावडे, माण, सातारा येथे ८ लाख रूपये किंमतीची ६ गुंठे जमीन
- लेंगरे, खानापूर, सांगली येथे २० लाख रूपये किंमतीची २ हेक्टर ६४ गुंठे जमीन
- वाखारी, दौंड, पुणे येथे २४ लाख रूपये किंमतीची ११ हेक्टर ९३ गुंठे जमीन
- मुंढवा, पुणे येथे ५१ लाख रूपये किंमतीची ५९३ चौरस मीटर जमीन
- जांभे, सातारा येथे २६ लाख रूपये किंमतीची १४ हेक्टर ८२ गुंठे जमीन पत्नी अनुराधा यांच्या नावाने
- जांभे, सातारा येथे २६ लाख रूपये किंमतीची १४ हेक्टर ८२ गुंठे जमीन मुलगा मयूराज यांच्या नावाने
- लवळे, मुळशी, पुणे येथे ९५ लाख रूपये किंमतीची १ हेक्टर २३ गुंठे जमीन
- नांदेड, हवेली, पुणे येथे १२ लाख रूपये किंमतीची ६ गुंठे जमीन
- अकलूज, सोलापूर येथे ३५ लाख रूपये किंमतीची ३११ चौरस मीटर जमीन

देशमुखांची ही सर्व जमीन जवळपास १२५ एकर एवढी आहे. देशमुखांची ही वतनदारी कितीतरी राजकारण्यांना मागे टाकणारी आहे. प्रभाकर देशमुख यांनी पवारांचे शासकीय स्वीय सहायक म्हणून केले आहे. त्याच्याही आधी ते पवारांच्या बारामतीचे प्रांत अधिकारी होते. मात्र पवारांच्या संपत्तीपेक्षाही कधीकाळी त्यांचे स्वीय सहायक राहिलेल्या देशमुखांची जमीन कितीतरी पटीने अधिक आहे.

देशमुखांना जमिनीचा एव्हढा सोस की, त्यांनी स्वतःच्या गावातील सहा गुंठ्यांचा प्लॉट देखील सोडला नाही. स्वतःच्या लोधवडे गावातील सरकारी प्लॉट देशमुखांनी लिलावात विकत घेतला. मात्र सरकारी अधिकाऱ्याला सरकारी प्लॉट सरकारी लिलावात विकत घेता येत नाही. तेही गावात स्वतःचं घर आणि जमीन असताना. याबाबत आता आक्षेप घेतला जातोय.

दुसरं म्हणजे इथेही देशमुखांनी कमाल जमीन धारणा कायदा धाब्यावर बसवलाय. केंद्र सरकारला दिलेल्या माहितीमध्ये देशमुखच स्वतःकडे १२५ एकर शेत जमीन असल्याचं सांगत आहेत. आणि कमाल जमीन धारणा कायद्यानुसार एका कुटुंबाला स्वःताकडे ५४ एकरपेक्षा जास्त जमीन ठेवता येत नाही.देशमुख मात्र यावर काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे या जमिनी त्यांनी कशा मिळवल्या याबाबत शंका व्यक्त केली जातेय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Wednesday, January 8, 2014, 20:14


comments powered by Disqus