Last Updated: Monday, June 16, 2014, 16:12
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआर.आर.पाटील 100 मीटर तरी पावलं धावतील का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या राजगर्जना या पुस्तकाचे प्रकाशन राज यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पोलीस भरतीचा विषय राज यांनी उचलून धरला होता.
पोलीस भरतीच्या वेळी झालेल्या चार युवकांच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे गृहखात्याला जबाबदार ठरलं जातय. पोलीस भरतीसाठी बोलवता कशाला मुंबईला, तुम्हांला त्या त्या जिल्ह्यामध्ये भरती करता येत नाही का ?
असाही प्रश्न त्यांनी केला असून हे तरुण कुठल्यातरी गावातून येतात एसटीतून येतात त्यांच्या पोटात काही नाही अन्न नाही पिणं नाही.
पाच पाच किलोमीटर धावायला लावतात त्या दोन तीन चार मुलं गेली धावता धावता, आर. आर. पाटील धावतील का 100 मीटर असा टोला ठाकरे यांनी केला.
मी नेहमी सांगत आलो, या राज ठाकरेच्या हातात महाराष्ट्र देऊन बघा, सुतासारखा सरळ करीन मी. सुतासारखा सरळ करीन म्हणजे काय सूत घेऊन ते सरळ करत बसणार नाही, जे कायदे बाद झालेले आहेत ते बाजूला करीन असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 16, 2014, 16:12