Last Updated: Monday, February 17, 2014, 16:40
www.24taas.com, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबईमुंबईच्या पोलीस आयुक्तपदाच्या नियुक्तीबाबत माझ्याजवळ कोणी नाराजी व्यक्त केलेली नाही. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी मेरीट हाच महत्त्वाचा निकष आहे.
सेवा ज्येष्ठतेनुसार ही नियुक्ती होत नाही, असं आर आर पाटील यांनी स्पष्ट केलंय. मात्र विजय कांबळे हे ज्येष्ठ अधिकारी आहेत. ते सात दिवसात हजर होतील. त्यांची मी स्वतः समजूत घालेन असं गृहमंत्री म्हणाले.
राज ठाकरे यांनाही तंबीमनसेच्या टोलविरोधी आंदोलनात झालेल्या नुकसानीची भरपाई राज ठाकरे यांनी दिली नाही, तर आम्ही निवडणूक आयोगाला याची माहिती देऊ, तरीही भरपाई दिली नाही.
तर कराची वसुली करतात, तशी त्यांची मालमत्ता जप्त करून वसुली केली जाईल, असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 17, 2014, 16:40