Last Updated: Monday, February 17, 2014, 16:44
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईनियमानुसार सात दिवसांत रूजू न झाल्यास वेगळा विचार करणार, असा इशारा गृहमंत्री आर आर पाटील यांनी विजय कांबळे आणि अहमद जावेद यांना दिलाय.
सेवाज्येष्ठता डावलून मुंबई पोलीस आयुक्तपदी राकेश मारिया यांची नियुक्ती करण्यात आल्यानं पोलीस दलातील दोन बडे अधिकारी कमालीचे नाराज झालेत.
विजय कांबळे यांच्यापाठोपाठ अहमद जावेद यांनीही सुट्टीवर जाऊन आपली नाराजी प्रकट केलीय. परंतु बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सपशेल फेटाळून लावलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 17, 2014, 16:44