Last Updated: Tuesday, September 4, 2012, 18:01
www.24taas.com, मुंबई`बिहारच्या डीजींच्या पत्राचे राजकारण सुरु आहे` असं वक्तव्य गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी म्हटलं आहे... या पत्रात कोणतीही धमकी नसल्याचा निर्वाळा गृहमंत्र्यांनी दिला आहे. शिवाय या पत्रात कायद्याचे पालन करण्याबाबत विनंती करण्यात आली होती असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला आरोप फोल ठरविला आहे. गेले अनेक दिवस बिहार आणि मुंबई पोलीस यांच्यावरून महाराष्ट्राचं राजकारण चागंलच ढवळून निघालं आहे. त्यामुळे राज ठाकरे आता यावर नक्की काय भुमिका घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.
पत्रात कोणतीही धमकी नसल्याचा निर्वाळा गृहमंत्र्यांनी केला आहे.`पत्रात कायद्याचे पालन करण्याबाबत विनंती`करण्यात आल्याचे म्हटले आहे. `बिहार आणि मुंबई पोलिसांचं सहकार्य चांगलं`आहे असंही सांगण्यास आर. आर. पाटील विसरले नाहीत. तर सरकारही गप्प बसलेलं नाही. असं सांगत त्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे.
First Published: Tuesday, September 4, 2012, 17:38