Last Updated: Saturday, September 8, 2012, 23:32
www.24taas.com, मुंबई`माझा संयम म्हणजे मी दुबळा असं कोणीही समजू नये` असा इशारा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी म्हटलं आहे... गेल्या काही दिवसापासून मनसे अध्य़क्ष राज ठाकरे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.
वारंवार राज ठाकरे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आबा पाटील यांनी राजीनामा देण्यास असमर्थतता दर्शवली होती. आणि आता राज ठाकरे यांच्या याच मागणीला आर. आर. पाटील यांनी सरळ सरळ उत्तर दिलं आहे.
`वेळ आल्यावर दुबळं नसल्याचं सिद्ध करु` असा पलटवार गृहमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेला लगावला आहे..
First Published: Saturday, September 8, 2012, 23:20