तिच्या धिंगाण्याचा इतरांना त्रास...Radha Thakkar disturbing other peoples

तिच्या धिंगाण्याचा इतरांना त्रास...

तिच्या धिंगाण्याचा इतरांना त्रास...
www.24taas.com, झी मीडिया, अंबरनाथ

अंबरनाथ स्टेशनवर एका महिलेनं धिंगाणा घातल्यानं बुधवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

राधा ठक्कर नावाची महिला शिर्डी पॅसेंजरमधून मुंबईकडे येत होती. अंबरनाथ स्टेशनवर पॅसेंजर अर्धा तास थांबलेली पाहून ही महिला खाली उतरली. लोकल ट्रेनची वाहतूक सुरु असल्याचं पाहून या महिलेनं धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. आधी पॅसेंजर सोडा अशी मागणी करत ती रेल्वे ट्रॅकवर झोपली. त्यामुळं मुंबईकडे येणाऱ्या लोकलचा खेळखंडोबा झाला.

जवळपास २० ते ३० मिनिटं या महिलेचा तमाशा सुरु होता.. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी महिलेला अटक केली... तिची चौकशी करुन तक्रार दाखल करण्यात आली. कल्याण रेल्वे न्यायालयानं या महिलेची जामिनावर सुटका केलीय. मात्र या महिलेच्या या धिंगाण्याचा फटका सामान्य प्रवाशांना सहन करावा लागला.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, November 7, 2013, 08:26


comments powered by Disqus