तिला दिला फ्लाइंग किस, त्याची रवानगी थेट पोलिसात, Rahul Tilak gave her a flying kiss

तिला दिला फ्लाइंग किस, त्याची रवानगी थेट पोलिसात

तिला दिला फ्लाइंग किस, त्याची रवानगी थेट पोलिसात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतील घटना. फिल्मी स्टाईलने त्याने तिला किस दिला. तोही फ्लाइंग. मात्र, हा किस त्याला चांगलाच महाग पडला. हिरोला दणका त्या तरूणीने दिला. तिने दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसात याबाबत तक्रार दिल्यानंतर त्याची रवानगी थेट पोलीस ठाण्यात करण्यात आली.

राहुल टिळक. तो सांताक्रुझमधील. गजधर बांध परिसरातल्या सिद्धिविनायक चाळीत राहणारा राहुल शनिवारी ग्रॅन्ट रोड येथे आला होता. तेव्हा रस्त्यापलीकडे उभ्या असलेल्या तरुणीला पाहून फिल्मी थाटात फ्लाइंग किस दिला. ते पाहून संतापलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली. राहुलला पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम ५०९ अन्वये अटकही केली. त्याला सात डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

राहुलला न्यायालयात सहा हजार रुपये भरून जामीन घ्यावा लागला. या गुन्ह्याबद्दल त्याच्यावर भविष्यात खटला चालेल तो वेगळाच. गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला दंड किंवा एक वष्रे कारावासाची शिक्षा होऊ शकते.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013, 17:09


comments powered by Disqus