Last Updated: Wednesday, April 17, 2013, 11:19
www.24taas.com, मुंबईरेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मुंबई उपनगरी रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी मंगळवारी टिळकनगर स्टेशन ते सीएसटी असा लोकलनं प्रवास केला.या प्रवासादरम्यान प्रवाशांशी संवाद साधला.
रेल्वे प्रवाशांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेच्या तक्रारीचाच पाढा वाचला. हार्बरवरील जुन्या गाड्या बदलण्यात याव्या. रेल्वेनं प्रवाशांना अधिक सोयी उपलब्ध करुन द्याव्यात... रेल्वेचे प्लॅटफॉर्मही स्वच्छ राहतील याची खबरदारी प्रशासनानं घ्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
लोकलच्या फे-या वाढवण्याची गरज आहे आणि प्रवाशांना चांगली लोकलसेवा मिळेल याची खबरदारी प्रशासनानं घ्यावी असं त्यांनी यावेळी अधिका-यांना सुनावले.
First Published: Wednesday, April 17, 2013, 10:48