प्रवाशांसाठी रेल्वे कॅन्टीन ठरतायत `फायर बॉम्ब`!, railway canteen working like fire bomb

प्रवाशांसाठी रेल्वे कॅन्टीन ठरतायत `फायर बॉम्ब`!

प्रवाशांसाठी रेल्वे कॅन्टीन ठरतायत `फायर बॉम्ब`!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सोमवारी दादरच्या पश्चिम रेल्वे दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन नंबरवरच्या कॅन्टीनमध्ये आग लागली. ही आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवांनाची चांगलीच दमछाक झाली. दादर रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडूनही रेल्वे प्रशासनानं मात्र या घटनेची अजूनही गंभीर दखल घेतलेली नाही.


नेहमीच प्रवाशांच्या गर्दीनं फुगलेलं दादर रेल्वे स्टेशन... 26 मे रोजी भर दुपारी दादरच्या पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन वरील एका कॅन्टीनला अचानक आग लागली आणि एकच हाहाकार माजला. अग्नीशमन दलाच्या जवांनानी ही आग वेळेत आटोक्यात आणली त्यामुळे सुदैवानं इथं कोणतीही जीवीत हानी घडली नाही, अशी माहिती जीआरपीचे सिनिअर पीआय राजेंद्र त्रिवेदी यांनी दिलीय.

याच महिन्यात 6 मे आणि 11 मे रोजी अशाच प्रकराची आग मुंबई सेंट्रलच्या प्लाटफॉर्मवरील कॅन्टीनलाही लागली होती. त्याहीवेळी अग्नीशमन दलाच्या जवानांमुळे प्रवाशांचे जीव वाचले. आगीच्या या घटनांनंतर मुंबई सेंट्रल रेल्वेच्या लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सिनिअर पीआय यांनी संबंधीत कॅन्टीन चालकांकडील कागदपत्रे तपासली असता एकाही कॅन्टीनकडे अग्नीशमन दलाचं ना हरकत प्रमाण नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.

तीनही ठिकाणी लागलेल्या आगीत एक समानता होती... ती म्हणजे तीनही ठिकाणच्या आगी लागल्या होत्या शॉर्टसर्कीटमुळे... खर तर ज्वलनशील गोष्टी रेल्वेपासून लांब ठेवायच्या असतात. मात्र रेल्वे कॅन्टीनमध्ये विजेवर चालणाऱ्या वस्तूंचा राजरोसपणे वापर सुरू असतो. यावर रेल्वे प्रशासनाचा कोणताही अंकुश नसतो. अशात अग्निशमनाची कोणतीही प्राथमिक उपकरणं या कॅन्टीगमध्ये नसल्यानं रेल्वे प्रवाशांच्या पोटपुजेसाठी उभारलेल्या या कॅन्टींन रेल्वे प्रवाशांसाठी फायर बॉम्ब ठरु लागल्यात.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 28, 2014, 15:43


comments powered by Disqus