Last Updated: Wednesday, August 22, 2012, 20:21
www.24taas.com, मुंबईसरकारी नोकरी मिळावी अशी आपणा सगळ्यांचीच इच्छा असते. मात्र अशी नोकरी सगळयांनाच मिळते असं नाही. मात्र आता रेल्वे बेरोजगारांसाठी धाऊन आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी भूमिपुत्रांना रेल्वेत नोकरीची पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. पुढील वर्षी मध्य रेल्वेत २५७२ जागांकरिता ‘डी’ ग्रूप वर्गाची भरती सुरू होणार आहे. त्यामुळे नोकर्यांसाठी वणवण भटकणार्या बेरोजगारांना यामुळे दिलासा मिळणार आहे. गेल्या सहा वर्षांतील मध्य रेल्वेची ही तिसरी नोकरभरती आहे.
‘डी’ वर्गातील ट्रॅकमन, हमाल, खलाशी, सफाई, असिस्टंट पॉइंट्समन या पदांकरिता मध्य रेल्वेच्या रेल्वे भरती कक्षाने अर्ज मागविले आहेत. मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या विभागात ही भरती होणार आहे. नोकरभरतीत रेल्वेने शारींरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी ७७ जागा राखून ठेवल्या आहेत. २५ सप्टेंबर ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असून नोकरभरतीसंदर्भात २५ ते ३१ ऑगस्टपर्यंत आहे
अशा आहेत जागा
खुला वर्ग १५१४
एससी ३७०
एसटी २०६
ओबीसी ४८२
एकूण २५७२
First Published: Wednesday, August 22, 2012, 20:21