Last Updated: Monday, August 27, 2012, 11:38
www.24taas.com, मुंबईमुंबईत वडाळा स्टेशनजवळ चार पोलिसांनी एका विक्रेत्याला धावत्या लोकलमधून फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये हा विक्रेता गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी रेल्वेच्या राहुल जेरडे, विजय ठाकूर, शंकर पाटील आणि सिद्धिराम मंगापूर या पोलिसांना अटक करण्यात आली. 18 ऑगस्टला ही घटना घडली होती. लोकलमधून या विक्रेत्याला बाहेर फेकल्यानंतर तो बेशुद्ध झाला होता. त्याच अवस्थेत त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
काल शुद्धीवर येताच त्याने झाल्याप्रकाराबद्दल पोलिसांना माहिती दिली आणि वडाळा पोलीस स्टेशनमध्ये या चार पोलिसांविरूद्ध तक्रार दाखल केली.
First Published: Monday, August 27, 2012, 11:35