Last Updated: Tuesday, November 13, 2012, 13:13
www.24taas.com, मुंबई रेल्वेच्या तिकीट खिडकीसमोर गर्दी हे आपणांसाठी नेहमीचच चित्र झालं आहे. त्यामुळे आता रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आता तिकीट मोबाईलवर उपलब्ध करून देणार आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी थेट मोबाईलवर तिकीट देण्याचा विचार पश्चिम रेल्वे करीत आहे. ही योजना अंमलात आल्यास पश्चिम रेल्वे देशातच नव्हे तर जगात पहिली रेल्वे ठरणार आहे.
ही योजना विशेषकरून अनारक्षित गाड्यांसाठी आहे. या गाड्यांच्या आरक्षणासाठी किमान एक दिवस अगोदर मोबाईलवरून आरक्षण करावे लागेल. या योजनेला प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहूनच लोकलसाठी ही योजना अंमलात आणली जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या एका अधिकार्याने दिली.
लोकलच्या प्रवासासाठी एक तास अगोदर तिकिटाची नोंद करावी लागेल. असे मिळेल तिकीट या योजनेचा लाभ पोस्टपेड मोबाईलधारक प्रवाशांना मिळणार आहे. यासाठी सर्व मोबाईल ऑपरेटर कंपन्यांशी रेल्वे प्रशासन चर्चा करणार आहे. तसेच त्यासाठी एक सॉफ्टवेअरही विकसित करावे लागणार आहे.
First Published: Tuesday, November 13, 2012, 13:02