Last Updated: Friday, April 26, 2013, 12:18
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई रेल्वे मंत्रालयाकडून आगाऊ तिकीट आरक्षण बुकिंग सेवेचा कालावधी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार चार महिने तिकीट आरक्षण सेवा आता दोन महिने केली असून, त्याची अंमलबजावणी १ मेपासून केली जाणार आहे.
प्रवाशांचा बराचसा त्रास वाचणार आहे. जे प्रवासी एप्रिलपर्यंत बुकिंग करतील त्यांना चार महिन्यांचा कालावधीचा नियमच लागू राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
रेल्वे तिकीट आरक्षणाचा नेहमीच गोंधळ होत असतो. अनेक प्रवाशांना रेल्वेची तिकीट मिळत नसल्याने त्यांना अनेकदा त्रास होतो. त्यामुळे आता तब्बल दोन महिने आधी प्रवाशांना तिकीट आरक्षित करता येणार आहे.
First Published: Friday, April 26, 2013, 12:09