ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत, Railway track crack, trance Harbour Railway Transport disconnected

रेल्वे ट्रॅकला तडा, ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत

रेल्वे ट्रॅकला तडा, ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत झाली होती. तुर्भे - कोपरखैरणे दरम्यान रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याने सकाळी वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे वाहतूक एक तास बंद होती. रेल्वे वाहतूक बंद अल्याने सकाळच्या वेळी प्रवाशांचे हाल झालेत.

रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्य़ाने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. हार्बर रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक एकाच वेळी विस्कळीत झाल्याने प्रवाशांच्या अडचणींमध्ये दुहेरी भर पडली आहे. या मार्गावरील तुर्भे आणि कोपरखैरणे या स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकला सकाळी साडेसातच्या सुमारास तडा गेल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली.

ट्रॅकला तडा गेल्यामुळे या मार्गावरील वाहतुक सुमारे २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाची ठाणे रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तातडीने हाती घेतलेले दुरुस्तीचे काम अद्याप सुरू आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 21, 2014, 10:06


comments powered by Disqus