राज कुंद्रा बनला लेखक, raj kundra become writer

राज कुंद्रा बनला लेखक

राज कुंद्रा बनला लेखक
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

शिल्पा शेट्टीचा पती आणि आईपीएल टीम राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा आता लेखक बनला आहे. काही दिवसांपूर्वीच सट्टेबाजीच्या आरोपामधून क्लीन चीट मिळालेल्या राज कुंद्राने `हाऊ नॉट टू मेक मनी` हे पुस्तक लिहिलं आहे.

`हाऊ नॉट टू मेक मनी` हे पुस्तक तीन मुलांच्या जीवनावर आधारीत आहे. जय, माइक आणि अजीज हे तिघं बालपणीचे मित्र आहेत. या तिघांना आपल्या आयुष्यात लवकर श्रीमंत व्हायचं आहे. अशी या पुस्तकाची कथा आहे. हे पुस्तक एका बेपत्ता झालेल्या, धोका देणाऱ्या व्यापाऱ्याच्या शोधावर आधारित आहे. या व्यापाऱ्याने २००० सालाच्या सुमारास ब्रिटिश सरकार आणि युरोपियन देशांमध्ये गैरव्यवहार करून पळ काढला होता. तसंच अरबी राष्ट्रांमध्येही घोटाळा केला होता.

राज कुंद्रा यांचे हे ‘हाऊ नॉट टू मेक मनी’ हे पुस्तक रॅंडम हाउस इंडियाद्वारे प्रकाशित केले जाणार आहे. हे पुस्तक पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये प्रकाशित होणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.


First Published: Thursday, September 5, 2013, 20:37


comments powered by Disqus