शिल्पासह राज कुंद्राची 'मातोश्री' आणि `कृष्णकुंज` वारी!, raj kundra, shilpa shetty meet raj thackray

शिल्पासह राज कुंद्राची 'मातोश्री' आणि `कृष्णकुंज` वारी!

शिल्पासह राज कुंद्राची 'मातोश्री' आणि `कृष्णकुंज` वारी!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्रा यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतंय.

रविवारी, अंधेरीतील फिल्मालय स्टुडियोमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. ‘मनचिसे’च्या युनियनच्या सभासदांना डावलून शिवसेना युनियनच्या सभासदांना काम दिलं, म्हणून कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली होती. इथं राज कुंद्रा यांच्या ‘सुपर फाईट लीग’चं शूटिंग सुरू होतं ते बंद पाडण्यात आलं होतं. यानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी याविरोधात प्रथम शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
शिल्पासह राज कुंद्राची 'मातोश्री' आणि `कृष्णकुंज` वारी!

दरम्यान, राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या चित्रपट सेनेच्या कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केल्याचं समजतंय. यापुढे पदाधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय कुणीही चित्रपटांच्या सेटवर जाऊ नये, अशी तंबीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भरलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, October 28, 2013, 20:31


comments powered by Disqus