Last Updated: Sunday, September 2, 2012, 14:47
www.24taas.com, मुंबईआज रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे यांनी पुन्हा परप्रांतियांवर निशाणा साधला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिहारी नेत्यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईतले आरोपी युपी आणि बिहारमध्येच का जातात असा सवाल राज ठाकरेंनी केला. बिहारमध्ये महाराष्ट्रातील गुन्हेगारांना आश्रय मिळतो, असा आरोपही राज ठाकरेंनी केला.
याचबरोबर गृहमंत्री यांना कसलीच माहिती नसते, असं राज ठाकरे म्हणाले. दिग्विजय सिंग यांना ‘कार्टं’ म्हणतं ते काँग्रेसचं बुजगावणं असून काँग्रेसनं त्यांना केवळ शिवीगाळ करण्यासाठी ठेवल्याचा घणाघात राज यांनी केला.
तसंच हिंदी चॅनेल्स मला हेतुपुरस्सर टार्गेट करतात असं सांगत त्यांनी माझ्यावरील टीकेचा खेळ थांबवला नाही तर मीच त्यांचा महाराष्ट्रातला खेळ थांबवेल असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
First Published: Sunday, September 2, 2012, 14:47