Last Updated: Thursday, December 26, 2013, 20:59
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे ठाण्यात झालेल्या राड्यात भाजपची पुरती लाज गेली. मिलिंद पाटणकर, संदीप लेले आणि संजय वाघुले यांनी यासाठी पुढाकार घेतला. यात भाजपची उरली-सुरलेली लाज घालवण्यासाठी आता राज पुरोहित यांनी पुढाकार घेतलाय. याच संदर्भातली एक धक्कादायक बातमी ‘झी २४ तास’च्या हाती लागली आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळालेल्यांना मुंबईतून बंडखोरीची फूस दिल्याचं उघड झालंय. ‘पाणीपुरी’ प्रकरणी वादग्रस्त विधान करणारे मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित या बंडखोरीला खतपाणी घालत असल्याची धक्कादायक ऑडिओ क्लिप ‘झी २४ तास’च्या हाती लागली आहे.
या क्लिपमधून राज पुरोहित हे एका इच्छूकाला तिकीट न मिळाल्यास बंडखोरीचा सल्ला देताना स्पष्ट दिसून येतंय. त्यामुळं राज पुरोहित पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत.
पाहुयात फोनवरील धक्कादायक संभाषणाची ही ऑडिओ क्लिप... •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 26, 2013, 20:59